STORYMIRROR

Varsha Patle Rahangdale

Romance

4  

Varsha Patle Rahangdale

Romance

आठवण

आठवण

1 min
318

आठवण तुझी येताच सख्ये

डोळ्यात पाणी साठते

हुंदका आवरून घेताच

कंठ माझा दाटुन येते


तुझ्यासवे घेतलेल्या आणाभाका

तु दिलेली वचने जपून ठेवलीत

आठवणींच्या साठवणीत त्यांना

मनात माझ्या कोरून ठेवलीत 


गंधाळतो वारा ही मग

जेव्हा तु मला आठवतोस

मन माझे वेडे होऊन

सोबतीला तु भासतोस


तुला कधी कळलेच नाही का रे

तुला बघणारे माझे डोळे

का फक्त करत होतास तु

आपला प्रेमाचे नुसते चाळे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance