Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Varsha Patle Rahangdale

Romance Others

3  

Varsha Patle Rahangdale

Romance Others

चारोळ्या

चारोळ्या

1 min
12.1K


आशय सुंदर आहे रे

तुझं ,माझ्यासाठी झुरण्याचा

पण प्रश्न भेडसावतो

खरचं प्रेमाने वागण्याचा


गाजऱ्यात फुल तुझ्या नावाचे

मी तर कधीचेच माळले

म्हणून तू भेटावास म्हणून

मन तुझ्यासाठी खास झुरले


गजऱ्यात फुल तुझ्या नावाचे

मी तर कधीचेच माळले

म्हणून तू भेटावास म्हणून

मन तुझ्यासाठी खास झुरले


तुझीच होती मी रे सख्या

तुझीच नेहमी मी राहणार

सोबत साता जन्माची ही

कधीच नाही रे सोडणार


मन झुरवू काय फायदा

आधी कोरोनाला पळवूया

भारतातील सुख शांती

पुन्हा परतवून आणूया


घरात बसून झुरता येईल

सुंदर स्वप्नही बघता येईल

सगळ्यांनी असे केले तर

कोरोना परत पळून जाईलकळतयं रे मलाही राजा

तुझ्या मनातील खोल घाव

झुरतं मन माझे तुझ्या साठी

पण तुलाच नाही याचं ठावनयणांत पाणी दाटते

मन अशांत होते

कातरवेळी एकांतात

मन तुझ्यासाठी झुरतेमन झुरतं माझेही साजना

स्वप्ने रंगवली मी संसाराची

आठवण तू तिकडे काढताच

बरसात होते हुचक्यांची


मन झुरतयं तुझ्याचसाठी

मलाही भेटायचयं तुला

खात्री कशी पटवू तुला रे

हेच कळत नाही मला


तू माझा राजा,मी तुझी राणी

सोबतीने राहायची इच्छा मनी

कोरोनामुळे भेटनं टळलयं

म्हणून मन झुरते रातदिनी


Rate this content
Log in