आई
आई
1 min
295
वात्सल्याची तु मुर्ती
किती वर्णावी तुझी किर्ती
ओढ लावी तुझी प्रिती
ओवाळते तुझी आरती
ममता वसे तुझ्या ठायी
अवघे जग सांगते आई
आईविना पोरके झाले
तीन्ही लोकांचे देव आई
सांभाळ करून घरच्यांचा
संस्कार देउन पोरांना
घडवतेस जगातील सर्व
होणाऱ्या भावी नागरिकांना
त्यागाची प्रेमळ मूर्ती
संसार सागरात तुझी साथ
कुरवाळून प्रेमाने लेकरांना
ठेवतेस डोक्यावर तु हात