चारोळ्या
चारोळ्या
देव आपल्याला काही देत नाही
आपणच ते ओढवून घेतो
सुख-दुःख सोबती आहेत
आपणच मनाला लावून घेतो
ओळखते मी दुःख
तुझ्या मनातील
सावरू कसे मी
अश्रू डोळ्यातील
आस तुझी पूर्ण होवो
हे देवाकडे मागणे माझे
स्वप्न सर्व पूर्ण होवोत
सुखात आयुष्य जावे तुझे
शब्दांची किमया असते न्यारी
शब्दांत मांडता येते भावना सारी
आडवळणी रस्त्यावर
साथ तुझी मला दे
संकटावर मात करत
आधार या जीवाला दे
प्रेमाची अडीच अक्षरे
दिली मी तुला भेट
कोरलंय तुझं नाव
माझ्या काळजात थेट
स्वप्नातल्या गावामध्ये
फक्त तुझाच भास होतो
जेव्हा माझे मन सखे
तुझ्याकडे धाव घेते
प्रेम हे शुद्ध,
निर्मळ झऱ्यासारखे
आयुष्य करते
घोंघावत्या वाऱ्यासारखे
आज उघडला होता मी
पसारा तुझ्या आठवणींचा
पुस्तकातील कित्येक पानांवर
थेंब होता तुझ्या आसवांचा
नकळत डोळ्यात पाणी आले
त्याच्या आठवणी गवसताच
तोच मात्र पाठ फिरवून गेला
माझ्या मनाचा वेध न घेताच