श्रावण
श्रावण
1 min
254
श्रावणातल्या जलधारांनी
हरखून गेली फुले अनं पाने
धराने पांघरला हिरवा शालू
जणू नवरी नटली नव्या श्रूंगाराने
कडाडून त्या विजा चमकती
लखलखाट नभात होतो
इंद्रधनूच्या सप्तरंगांने
आसमंत न्हाऊनी निघतो
रिमझिम पाऊसधारा
अहोरात्र बरसुन गाती
गवतपाती आनंदी सारेच
वाऱ्यासंगे त्याही हसती
निळ निळाई आभाळाची
आंनदात पक्षी गाणे गाती
खळखळणारे झरे खळाळून
सागराच्या भेटीस जाती
क्षणात शिरव्यांची दस्तक
अनं क्षणात फिरूनी उन्हे येती
ऊन पावसाचा खेळ पाहण्यात
प्राणी मात्र मग रंगुनी जाती
