STORYMIRROR

Varsha Patle Rahangdale

Others

4  

Varsha Patle Rahangdale

Others

गरूड झेप

गरूड झेप

1 min
559

घे उंच भरारी आकाशी

तडजोड करू नको स्वप्नाशी

तू काली, तू दुर्गा, अंबिका

का? तूच घेतला त्यागाचा ठेका


समाजाच्या रूढी परंपरा

तुलाच का?त्यांचा घेरा

दाखव स्त्रीत्वाचा तु तोरा

का? तूच उचलावा संसाराचा भारा


घे गरूड झेप आकाशी

दोन हात करून पुरूषांशी

काय गरज तुला स्पष्टीकरणाची

असू दे, पुरुषप्रधान संस्कृती


तू कमजोर नाहीस कोमल आहेस

तू जगाची आहेस माय माऊली

घाबरू नकोस कुणालाही आता

वाटेत कितीही येवोत गुंड, मवाली


Rate this content
Log in