प्रेमावरील चारोळ्या
प्रेमावरील चारोळ्या


रातराणीचा मनमोहक सुगंध
पसरला आसमंतात सारा
चाहूल तुझी लागताच सुटला
मंद मंद असा मदमस्त वारा
प्रेमळ अशा भावनांना
काठी का द्यावी शब्दांची
तू सोबत असताना मज
फिकीर नाही भविष्याची
प्रीतीची परिभाषा जरा
निराळीच होत गेली
तुझ्या सवे आठवांची
नाळ जुळत गेली
रात्र ही वैरीण झाली
तू सोबतीला नसल्याने
गुपित ही सारे उघडले
शब्द मनाला डसल्याने
शब्द बोचरे असतात
मनाला पटकन लागतात
ओठांवर आले असता
शब्द मग जिव्हारी लागतात
दुरावाच आला वाट्याला
कधी प्रेम भेटलेच नाही
वळणावर एकटीच चालले
सोबती कधी भेटलाच नाही
कळलं पण वळलं नाही
प्रेम तुझ्या मनातलं
तू ही कुठे प्रेम तरी
माझ्या पुढ्यात ओतलं
सोना जरूरी नही होता
खयालो मे खोने के लीए
मिलना जरूरी नही होता
यादें संजोने के लिए