Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Varsha Patle Rahangdale

Others

2  

Varsha Patle Rahangdale

Others

चारोळ्या

चारोळ्या

1 min
3.0K


आज ओस पडला वाटतं

जीवाभावाचा समूह सारा

मी वेडी वेळ काढून आली

सावरण्या समूहाचा पसारा


अश्रूंना वाट मोकळी

करून दिली आज

का बरे त्याला याची

आली नाही लाज


सुगंधीत रात्र झाली होती

जेव्हा तो रोज बोलायचा

माझ्या एका उत्तराची

तासनतास वाट बघायचा


ज्यांच्या बायका असतील

त्यांचे पान हलत नाही

पण ज्यांची बायकोच नसेल

त्यांचं काय होते देवच जाणे बाई


दुःख माझ्या मनातील

त्याला कधी कळले नाही

प्रेम होतं माझे त्याच्यावर

पण त्याला हे उमगले नाही


जीव ओवाळून प्रेम

मी करत होती आयुष्यभर

पण त्यालाच कीव ना आली

माझी कधीच कणभर


विरह सहन होत नाही

घाव भरून येत नाही

आयुष्यातील दुःखे आता

काही केल्या संपत नाही


टाकताही येत नाही

अन दाखवताही येत नाही

गोड ओझं आयुष्यभर

नीट जगूही देत नाही


तुझ्या शब्दांनीच तर मला

धीर दिलेला होता रे

वळणावर एकटी सोडून

तू का? म्हणून गेला रे


जुन्या आठवणी नकळत

आयुष्य पटलावर येतात

मन ही वेड्यासारखे

त्यात गुरफटून जातं


तिचे माझ्याकडे सहेतूक बघणे

आता खरंच सहन होत नाही

तिला आपल्या मनातील सांगणं

तेही सहज काही जमत नाही


नकळत नयन डबडबले

तुझ्या आठवणी ताज्या झाल्या

शब्दांनाही पाझर फुटून मग

त्या सैरावैरा धावू लागल्या


आतुर तुझ्या मिलनासाठी

मन हे तळमळते माझे

आठवण तुझी येताच

जीव गहिवरते माझे


मानाचा मुजरा माझा

साहित्यसंपदेच्या हिऱ्यांना

लाजवतील अक्षरशः हे

नभांगणातील ताऱ्यांना


कळतंय पण वळत नाही

मन हे भाबडे असते

आयुष्यात प्रत्येक वस्तू

म्हणून तर आपली भासते


प्रेमाची थट्टा करून

काय भेटले त्याला

झुरत मला ठेऊन

आनंद त्यास झाला


माझ्याशी न बोलण्याचं

मौनव्रत त्याने घेतलंय

का कुणास ठावूक पण

मलाच त्याने छळलंय


दावे फोल नव्हतेच कधी

मनमयूरही नाचले होते

क्षणभर का होईना रे

पण ते क्षण फक्त माझे होते


वचन पाळले मी

आठवणीत तुला ठेवण्याचे

तूच अजूनही आला नाही

वचन देऊन तू येण्याचे


आतुर मनाला माझ्या

तुझाच ध्यास असतो

आठवणींच्या कप्प्यात

तूच मला गवसतो


Rate this content
Log in