Shop now in Amazon Great Indian Festival. Click here.
Shop now in Amazon Great Indian Festival. Click here.

Varsha Patle Rahangdale

Romance Others

3  

Varsha Patle Rahangdale

Romance Others

चारोळ्या

चारोळ्या

1 min
11.7K


जीव तळमळतो आता

श्वास ही घेता येत नाही

गुदमरतो जीव माझा

आठवणीही सोबत नाही


भळभळून वाहते जखम

ह्रदयात वेदना होतात

आठवणीच मग सोबतीला

फेर धरून नाचतात


व्यवहारीच असणे

महत्त्वाचे नसते

भावनांची गुंफन

जगणं शिकवते


तुझ्याविणा जगणे मला

सांग कसे शक्य आहे

जाऊ नको सोडून मला

श्वास ही अशक्य आहे


आठवणींच्या सोबतीनेच

जीवन जगता येतं नाही

विरह सहन करतानाही

त्यांची सांगड बसत नाही


विस्मरण कधी होत नाही

पण कधीतरी खूप सतावते

जीवघेणा हा खेळ जीव्हारी

मनाला नकळत स्पर्शून जाते


सुंगधीत केल्यास अत्तरापरी

साठवून ठेवलेल्या आठवणी

तरीही ती काळरात्र ठरली

कितीतरी मला जीवघेणी


स्वतः वरच कधीतरी

प्रेम करून पाहाव

भिजल्या डोळ्यांनी

मन न्हाऊन घ्याव



प्रेमाला देता येत नाही

कोणतीही उपमा

त्यात दिसते निर्मळ

शुद्ध अशी प्रतिमा


घुसमटलेल्या श्वासात

तुझाच वास आहे

सोडवण्यासाठी केलेला

तुझा अट्टाहास आहे


लोण्यासारखं मन असायला

नशीब लागतं आयुष्यात

प्जीव तोडून प्रेम करेल कुणी

असा आहेच नाही भविष्यात


हिशोब मांंडायला मला

तूच नीट शिकवलसं

गोड बोलून नुसतचं

मस्तपैकी फसवलसं


टाळतोयस तू मला

काय गुन्हा घडला

बोलनं ही थांबलय

का असा नडला


जवळ घे कुशीत मला

बहरूदे तुझी माझी प्रित

मी तुझीच साजनी सख्ये

अनं तुच माझा मनमीत


भारतीय संस्कृतीची विचारा

आता ख्याली खुशाली सारी

व्यंजनेही लज्जतदार आपले

आणि त्यांची चव ही लयभारी


भारतीय संस्कृतीचीच विचारा

आता ख्याली खुशाली सारी

व्यंजनेही लज्जतदार आपले

आणि चव ही लय भारी


फुलला पळस,गुलमोहर

अनं बहरती प्रित सख्यारे

वाहूदे आसमंतात आज

मनसोक्त प्रेम वारे


धुंद तुझ्या प्रेमात होऊन

बेधुंद प्रेमगीत आज गाऊ

तु अनं मी आज सखी

दोघे एकरूप असे होऊ


देहभान हरपून गेले

तुला पाहताच समोर

धूंद चढली चारोळीची

नाचू लागले मनमोर


रातराणीचा मनमोहक सुंगध

पसरला आसमंतात सारा

चाहूल तुझी लागताच सुटला

मंद मंद असा मदमस्त वारा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance