अव्यक्त प्रेम
अव्यक्त प्रेम
समोर असताना ती
खुप काही सुचायचे.
सांगायला गेलो मग
माञ ओठांवर अडखळायचे.
ऐके वेळी, सायंकाळी
भेट अचानक झाली.
सांगणार होतो तेवढयात
तिची मैञीण आली.
डोळयात पाहिल्यावर तिच्या
मी मला स्पष्ट दिसायचो.
हदयात असेल का ?
या प्रश्नाने थोडा ञस्त असायचो.
मनात माझ्या होते जे
होते मनात तिच्याही.
सांगायचे धाडस माञ
मी आणि तिनेही केले नाही.
कारण स्वप्न तुटण्याची भिती
तिच्या अन् माझ्याही मनात होती.
दिवसामागुन दिवस निघुन गेले
*अव्यक्त प्रेम* अव्यक्तच राहिले.

