STORYMIRROR

Amol Londhe

Romance

3  

Amol Londhe

Romance

अव्यक्त प्रेम

अव्यक्त प्रेम

1 min
237

समोर असताना ती

खुप काही सुचायचे,

सांगायला गेलो मग

मात्र ओठांवर अडखळायचे...


एके वेळी, सायंकाळी

भेट अचानक झाली,

सांगणार होतो तेवढ्यात

तिची मैत्रीण आली...


डोळ्यात पाहिल्यावर तिच्या

मी मला स्पष्ट दिसायचो,

हृदयात असेल का?

या प्रश्नाने थोडा त्रस्त असायचो...


मनात माझ्या होते जे

होते मनात तिच्याही,

सांगायचे धाडस मात्र

मी आणि तिनेही केले नाही...


कारण स्वप्न तुटण्याची भिती

तिच्या अन् माझ्याही मनात होती,

दिवसामागून दिवस निघून गेले

अव्यक्त प्रेम अव्यक्तच राहिले...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance