STORYMIRROR

Rajiv Masrulkar

Others

4  

Rajiv Masrulkar

Others

काहूर

काहूर

1 min
449

तू जवळ आहेस

असं क्षणोक्षणी वाटतं

तरीही का मनात

असं काहूर दाटतं?


झुलतो वारा, फुलतो मोगरा

तुझ्या आठवणीने येतो शहारा

उडते मेघ, पावसाची रेघ

तुझ्या केसांच्या गंधाने भेग

पडते मनाला

मृद्गंध झाल्यासारखं वाटतं!


पहाटे पहाटे तुला शोधता एकटे

मखमली स्पर्श तुझा धुक्यातून भेटे

उन्हातून, पाखरांच्या चिवचिवीतून

तुझे बोल, तुझे सूर ऐकता दुरून

सावल्यांमधून तूच आल्यासारखं वाटतं!


नदीच्या किनारी, रोज उदास दुपारी

कुणी गातसे विराणी, हुंदकेही येती कानी

जाई बेभानून मन, डोळे थकती धावून

शोधताना तुला तन जाई घामेजून

पैलतिरी फुलांतून तुला हसू फुटतं!


एकदाच सखे, फक्त एकदाच ये

भ्रमांना नि भासांना या खरे रूप दे

वाऱ्यातून, ताऱ्यांतून

पावसाच्या सरीतून

धुक्यातून, उन्हातून

सरीतेच्या पाण्यातून

नवीन अवतार घे.. . ...

वेगाने वेगाने ये.....

त्वेषाआवेशानं, श्वासाविश्वासानं

तुझंच व्हावंस वाटतं..!


तू जवळ आहेस

असं क्षणोक्षणी वाटतं

तरी का हे मनात

असं काहूर दाटतं..?


Rate this content
Log in