STORYMIRROR

Rajiv Masrulkar

Others

5.0  

Rajiv Masrulkar

Others

तुझी

तुझी

1 min
376


एवढी झाली नजर का वाकडी पुरुषा तुझी

वाटते सोलून घ्यावी कातडी पुरुषा तुझी


तू तुझा इतिहास घे समजून जन्मापासुनी

घेतली गिरवून मी बाराखडी पुरुषा तुझी


जीभ छाटावी तुझी सीतेस वाटे कैकदा

लांघते भाषाच रेषा रांगडी पुरुषा तुझी


तूच तर केलीस खिचडी जात धर्माची तुझ्या

रीत पाळावी कशी घाणेरडी पुरुषा तुझी


सिद्ध कर श्रेष्ठत्व सत्कार्यातुनी प्रत्येकदा

सोड वर करणे कुठेही तंगडी पुरुषा तुझी


आजवर तू पेटवत आलास नारीला म्हणे

पेटवत हो

तास तू तर झोपडी पुरुषा तुझी


राऊळी करतोस पूजा, घालशी लाथा घरी

केवढी भक्ती निखालस बेगडी पुरुषा तुझी


हक्क देहाचा अबाधित ठेवते आहे स्वत:

प्रेयसी असले जरी मी भाबडी पुरुषा तुझी


भिडवुनी डोळा, तुझ्या खांद्यास खांदा लावुनी

सज्ज आहे मी वळवण्या बोबडी पुरुषा तुझी


कोणत्या शाळेमध्ये पुरुषार्थ शिकवावा तुला

दाखवी पुरुषत्व केवळ काकडी पुरुषा तुझी


कृष्ण शिवबा बुद्ध गांधी ज्योतिबा भिमराव तू

सद्गुणांनी भर पुन्हा तू पोतडी पुरुषा तुझी


Rate this content
Log in