' प्रेम ' / ' प्रीत '
' प्रेम ' / ' प्रीत '
रोज क्षणभर सखे आठवण मज येते
काळजाला माझ्या दिनभर ती छळते.
तुझ्या आठवांचा झुला मी गं झुलतो
तुला समजूनी ताऱ्यांशी मी बोलतो.
प्रीत अंतरीची मजला खोलवर सलते
घाव काळीज बोचरे नित्य मना जाळते.
आपल्या प्रेमाची चंद्र साक्ष गं देतो
नभी ताऱ्याना कवेत तो सांभाळतो.
ह्रुदय स्पंदने तुझ्याच नावास उघडते
तुज स्मरून प्रेमाने घट्ट होऊन बिलगते.
युगांच्या त्या आणाभाका मजला आठवते
पुनः पुनः मजला वचनात बांधून घेते.
केवड्याचा गंध रोज असला भूलवितो
स्वप्नांच्या झुल्यावर अलगद लोळवितो.
नाते मनीचे कुणास आपले कळते ?
विरहाच्या अग्नीचे दाह मनास जाळीते.
आठवांवरच पुढे सारे आयुष्य जगतो
तुझी माझी प्रीत सखे काळजात जपतो.
नागमोडी आयुष्यात घेऊन मज जाते ?
सरणावरच्या मरणाला बेफिकीर जाळते.

