वेध गुलाबी थंडीचे
वेध गुलाबी थंडीचे
वेध गुलाबी थंडीचे
तुझ्या माझ्या मिलनाचे
येते आठव सयेची
मन वेडे गारव्याचे
झोंबे अंगास गारवा
करी मनाचा कालवा
लागे चाहूल निषेची
यौवनाला वेळ हवा
ऊब मिळण्या अंगाला
आस जाळीते मनाला
शोध घेती बहाण्याचा
प्रेम ह्रुदयी भरण्याला
निघे वर्षा परतीला
देते वारा संगतीला
हवा सर्वां ऋतु नवा
रंग गुलाबी थंडीला
मनी कसे वसतात?
खोल कसे ठसतात?
आठवांच्या गाभाऱ्यात
नित्य प्रिय साठतात
येते भरती प्रेमाला
ओढ दाटते मनाला
वेध लागता थंडीचे
भरू रित्या ओंजळीला

