शेतकरी
शेतकरी
1 min
478
काळ्या मातीत मातीत
रोज राबे शेतकरी
उभी हयात सरते
बनुनिया सेवेकरी...
अंकुरता रे बियाणे
मनी आनंद दाटतो
साद घालतो नभाला
स्वप्न उद्याचे थाटतो...
शेत येता बहरून
येते आनंदा उधाण
पोरापरी सांभाळीतो
माया करी मनातून...
घेतो डोळी साठवून
येता पीक काढणीस
पुजुनिया तो मातीस
लावी धान्याची आरास...
साऱ्या जगास पोसुन
त्यास धन्य वाटतसे
व्रत घेवोनिया सेवा
संकटांसी लढतसे...
