हर्ष गुलाबी गारवा...
हर्ष गुलाबी गारवा...
नजरेतला उबदारपणा
गुलाबी थंडीत शहारला
हर्षाचा कटू गोड गारवा
प्रेमाच्या वाऱ्यात मिसळला
झरे नात्यात उल्हासाचे
संगीत संथ वाऱ्याचे
गाणे कुडकुडत्या ओठांचे
नाच वेड्याखुळ्या मनाचे
सुगंध आपुल्या तणाचा
मनसोक्त वाऱ्यात मिसळला
बेभान बेधुंद शब्दांचा
गारवा आवाजात जाणवला
मिठीत येता कुशीत निजणे
ऋतुचक्राचा खेळ साजरा
अशांत जीवाला सुखावणारा
भावनांना प्रेमाचा दुजोरा

