Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Romance

2.8  

Chandan Pawar

Romance

कान्हा

कान्हा

1 min
407


कान्हा, तुझ्या प्रेमात

मी झालीय वेडी ;

प्रेमसागर सखा तू

हृदयाच्या तार छेडी


कान्हा ,तू माझ्यात असूनही

 माझ्यात वाटत नाही;

ओठांशी धरता सप्तसुरा

तनाची होई लाही लाही


कान्हा, मी नुकतीच

आली रे यौवनात;

सांग प्रेमसख्या, काय

आहे तुझ्या मनात?


कान्हा, तुला माझ्या

हृदयाचा ठाव नाही;

तू चंचल, अस्थिर

तसा माझा स्वभाव नाही


कान्हा ,घालमेल जीवाची

तुला सांगू कशी?

मीच दिलं तुला हृदय

परत मागू कशी?


कान्हा, अतूट आपले

प्रेमनाते फुलवू निरंतर;

अमर आपुले प्रेम

जगी टिकेल निरंतर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance