STORYMIRROR

Prasad Kulkarni

Romance

4  

Prasad Kulkarni

Romance

चंद्र प्रेमाचा

चंद्र प्रेमाचा

1 min
571

शुभ्र दुधी प्रकाशात

उजळूनी उभा राहतो

कृष्ण, गोपिकांभवती

तारकांत तसा भासतो


लाजऱ्या स्मृतींना प्रेमाचा गंध तो

स्पंदांचा नाद हृदयात उमलतो

तुझा मुखचंद्रमा, विरह मनी उसासतो

बेचैनी हुरहूर सतत जीवा लावतो


उद्गाता रे तूच प्रितीचा

प्रेम गीतांचा निर्माता तू

सखा तूच प्रेमी युगुलांचा

बेधुंद रजनीचा नाथ तू


पौर्णिमेची रात्र धुंद ती वसुंधरा

व्याकुळल्या प्रेमाने सादते शशिधरा

आतुरल्या कायेला समीर शिरशिरावतो

प्रियकर या सृष्टीचा तूच तो तूच तो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance