स्वप्नातील फुलरानी
स्वप्नातील फुलरानी
गोजीर रूप तुझं, दिसतेया चंद्रावाणी
अंधाऱ्या राती, दिसतेया उजळूनी...
सांगतोया राणी तुला, घे गं मला समजूनी
प्रेम करतो तुझ्यावर, प्रेमवेळा झाल्यावानी
सांगत फिरतो मी गं, तूच माझी हीरकणी
वाट बघतो तुझी, पाण्यासाठी चातकावाणी...
ऊन वारा पावसामध्ये, गाऊ चल गं गावरानं गाणी
फिरतो सतत मी गं सख्ये, तुझ्यासाठी पाखरावानी
हिरवे गार रान जसे, डोलत असते मनोमनी
पोपट पंच्छी बनून, सांगत बसतेस माझ्या कानी....
स्वप्नात येतेस माझ्या, मोहिनी बनूनी
मोहित झालो, तुझ्या प्रेमात पडूनी
प्रेमळ तुझे बोल, मधूर तुझी वाणी
तूच आहेस माझ्या, स्वप्नातील फुलरानी...

