STORYMIRROR

NEERAJ ATRAM

Romance Others

3  

NEERAJ ATRAM

Romance Others

रानमाळ

रानमाळ

1 min
336

सजनी गं जाऊ चल, मोकळ्या रानी

पाखरांचा किल बिल, एकू येतो कानी...


हिरव्यागार रानामंदी, कोकिळ गाणी

एकत राहावे, तिची ही वाणी

शब्दांचा, वर्षाव, झाला गं सजनी....


बहरून आली झाड, रान फुलांनी

स्वागत करतय जणू , फुले बिछवूनी

क्षण हा टिपूण, ठेवू आपल्या मनी....


वृक्ष हा सर्वांना देते गं सावली

सर्वांची ती आहे, शितल माऊली

वनराईचे, रक्षण, करुया मिळूनी....


गार गार ही हवा, जाते गं स्पर्शूनी

जीवनाचा संदेश, जाते गं सांगूनी

संसार, सुखाचा, करू गं मिळूनी...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance