STORYMIRROR

NEERAJ ATRAM

Romance

3  

NEERAJ ATRAM

Romance

प्रेयसीचे गुपित

प्रेयसीचे गुपित

1 min
201

गार वाहणाऱ्या वाऱ्या, जरा थांबना

माझ्या प्रेयसीचे गुपित, तू रे सांगना...


माझी सजनी, रुसून का बसली

काय उणीव, तिला रे भासली

इथे झुळझुळाणाऱ्या वाऱ्या, बोलना...


लाळी गोळी, खूप काही केली

येणाऱ्या जाणाऱ्यांनी, समजूत काढली

इथे खळखळणाऱ्या पाण्या, वळणा...


वनराई तुझ्यासाठी, बहरुन आली

आपल्या प्रेमासाठी, आतूर झाली

हे गडगडनाऱ्या ढगा, थांबना...


हळूच दुरून ती, इशारा केली

इशाऱ्याने खूप काही, सांगून गेली

हा निसर्ग त्याचा, साक्षी आहे ना....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance