STORYMIRROR

NEERAJ ATRAM

Others

3  

NEERAJ ATRAM

Others

प्रेम वेळी

प्रेम वेळी

1 min
294

तूच मला दिले रे, एकच वचन

वचनात गुरफटून, आहे तुझे मन....


दाही दिशा मिलनासाठी, झाल्या आतूर

वाट बघते तुझी मी रे, रात्र जागून

व्याकुळ होऊन तुझ्यासाठी, करते नमन

पाझरा कसा फूटत नाही, झऱ्या समान....


भुरकन उडून ये रे, पाखरू बनून

कितेक दिवस झाले, तुला रे बघून

हाक देते प्रेमाची, ये रे तू धावून

कसा मिळेल तुझ्या, मनी समाधान ...


तुझी मी रे फुलराणी, घे रे ओळखून

रानावनात फिरत असते, प्रेम वेळी होऊन

कधी स्पर्शून देशील, तू रे आलिंगन

तुझ्या प्रेमळ हाकेसाठी, आतुरले मनं...


कधी येशील तू रे, सुगरन पक्षी बनून

माझ्यासाठी घरटा, घे रे तू बांधून

तुझ्या सुख दुःखाची, होईल अर्धांगिनी

तुझ्या सावलीत मला, घे रे सामावून....


Rate this content
Log in