मोहिनी
मोहिनी
मन मोहिनी सखे गं तू सजनी
अग भूललो मी तुझे रूप पाहूनी....
आभाळागत माया माझी, आहे तुझ्यावरी
तुझी तस्वीर जपून माझ्या, ठेवीन गं उरी
माझ्या स्वप्नातली, तू गं फुलरानी.....
अमावस्येची काळोख, रात्र असली तरी
तुझ्या प्रेमाचा प्रकाश पडतो माझ्या वरी
जशी आहेस गं, चतकोर चांदनी....
या सृष्टी मधली, तू मस्त जवानी
लाजतेस जसी, तू गं चंद्रावानी
तू घेशील ना, मला हृदयात भरूनी.....
सतत घेत राहू आपण, गगन भरारी
असेच पोहचू आपल्या, प्रेमाच्या किनारी
हे अमर प्रेम, देऊ जगा दाखवूनी.....

