माय मराठी
माय मराठी
1 min
373
माझ्या मराठी भाषेचा
किती गाऊ हो गोडवा
आत्मसात करून तिला
जीवन स्वत:चे घडवा
जन्म झाला हो इथेच
गंध आला या मातीला
मुखी नांदते सर्वांच्या
जीवनभर असते साथीला
लहान मुलाच्या मुखातून
निघे बोबडे ते बोल
शब्द ऐकू येता कानी
तेव्हा कळे तिचे मोल
देश विदेशात तिचा
डंका वाजतच आहे
शब्दोशब्दी इतिहास
संस्कृतीची जोड आहे
कितेक माणसे घडली
उच्चपदस्थ ती गेली
तिचा मान राखू आपण
आहे आपली माऊली
