STORYMIRROR

NEERAJ ATRAM

Romance

4  

NEERAJ ATRAM

Romance

रुसवा

रुसवा

1 min
495

बोल ना गं जरा बोल ना

हा रुसवा का धरलीस

सांगना गं मला सांगना.....


तुझ्यासाठी आणू का गं

चंद्राची कोर

बागेत कसा नाचत आहे

बघ हा मोर

अग राणी गं

माझ्या सवे खेळना.....


माझ्यापासून तू ग अशी

दूर नको जाऊ

गोड गोड तुझ्यासाठी

आणू का ग खाऊ

तुझ्या आवडीचा

बघ नजराना.....


चिऊताई बघ कशी

पहात गं आहे

तुझ्यासाठी हृदयात माझ्या

जागा ठेवली आहे

माझ्या प्रेमाचा

स्विकार करशील ना


दोघे मिळून आपण

घरट्यामध्ये राहू

जगाला प्रेमाची

खरी ताकत दावू

माझ्या जीवनाचा

भाग होशील ना...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance