STORYMIRROR

NEERAJ ATRAM

Romance

3  

NEERAJ ATRAM

Romance

स्वप्न सुंदरी

स्वप्न सुंदरी

1 min
1.2K

सांगू कसे मी कुणाला

ती स्वप्नी येऊन गेली...


ध्यानी मनी नसतांना

स्वप्नात माझ्या आली

काही तरी हळूच माझ्या

कानी सांगून गेली....


माझ्याकडे पाहून ती

दुरून इशारा केली

हळूच येऊन मला

स्पर्शून हो गेली....


माझ्यासाठी तू का गं

प्रेमवेडी झाली

सगळ्यांना सोडून

माझ्याकडे आली....


वाढत असते ती

झाडावरची वेली

काय पाहून प्रेम तू गं

माझ्यावर केली....


तुझ्या खातर जगाची

पर्वा नाही केली

तू गं माझ्या जीवनाची

बाग फुलवली.....


जीवनात माझ्या येऊन

संसार थाटून गेली

अशी ही भोळी भाळी

सजनी मिळाली...


कुणाची का वाईट नजर

माझ्या संसारला लागली

संसार सगळा माझा

उध्वस्त करुन गेली...


पहाटेच्या पहराला

जाग मला आली

पहालेले स्वप्न माझे

तशीच वाहून गेली...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance