STORYMIRROR

Gangadhar joshi

Romance

4  

Gangadhar joshi

Romance

सखी

सखी

1 min
472

वाटते सखे ग सजवावे तुला

कुठ ठेवू कुठ नको अस झालय मला


करीन नक्षत्रांची साडी जरतारी

शोभेल तुला तुझ अंग भरजरी

मोर नाचरा काढू पदरावरी

तुला पाहून जीव झाला वेडा खुळा


लता वेलींचा बन्धीन सुबक झूला

रंगी बेरंगी फुले माळी न त्याला

झोपा ळया वर बसवून झुलविन तुला

आज चेहर्या वरचा गुलाब फुलला


सोन्याचे ताट बसण्यास चांदीचे ताट

काय सांगू तुला मेजवानीचा थाट

गुलाबाचा घास भरवीन तुला


तुला झोपण्याला चंदनी पलंग

लोड उश्या गाद्यांचे सोनेरी रंग

शय्या सोबतीला आतुर श्रीरंग

राधेच्या या रुपाला श्रीधर भुलला


कोकिलेच कुंजन चन्द्र चांदणे

फुलामधुन चाले भृमर गुंजन

आंब्याच्या वनी तेथे मोर नाचला


वाटते सखे ग सजवावे तुला



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance