आयुष्याच्या वाटेवरती
आयुष्याच्या वाटेवरती


आयुष्याच्या वाटेवरती साथ मला देशील का
या स्वार्थी जगा पासून दूर मला नेशील का?
प्रेम हवे तुझे ते मला देशील का
नात तुझं माझं नाव त्याला देशील का?
समुद्राच्या काठावर नाव माझं घेशील का
रात्रीची स्वप्ने दिवसा पूर्ण करशील का?
एकत्र येऊन समाजाला तोंड देशील का
स्वप्न सर्व तुझंच आहे तेच मला देशील का?
आयुष्याच्या वाटेवरती एकटे मला सोडशील का?
आयुष्याच्या वाटेवरती एकटे मला सोडशील का?