आई विना...
आई विना...

1 min

650
आई विना जग सुनेसुने वाटे।
न तिच्या मायेविना आयुष्य आटून जाते।।
आई म्हणविता आज लाज वाटे।
प्रेयसीच्या मोहात आई नको वाटे।।
आई विना जग सुनेसुने वाटे
जन्म देता आईची किमया दाटे।
वृद्धपणी आई नकोशी वाटे।।
आई विना जग सुनेसुने वाटे
स्तनपान करता मुखी अमृत दाटे।
तारुण्य काळात सर्व नकोशी वाटे।।
आई विना जग सुनेसुने वाटे
लेकरासाठी ती दिवस-रात्र झटते।
पण तारुण्यात आई नकोशी वाटते।।
आई विना जग सुनेसुने वाटे