पश्चाताप
पश्चाताप
तेव्हा विचार केला असता,
तर _ _ आता ही वेळ आली नसती,
सर्व संबंध तुटले म्हणून,
निराशा पदरी पडली नसती,
काय करू ! काय करू ! सांगा ना ?
हा शब्द सारखा सतावत असतो,
मनी पडलेला हा प्रश्न,
उत्तर मात्र सर्वीकडे शोधत असतो,
असचं, असचं होत या वयात,
कुणीतरी भावनेच्या आधारे वाहून जात प्रेमात,
आधी विचार मात्र करता येत नाही,
आणि मग रडायला जीवनही पुरत नाही ।।

