मैत्री
मैत्री
1 min
315
विश्वासावर आधारित मैत्री असते ।। धृ।।
जात-पात-धर्म तिला काहीच नसते,
तुच्छ असतात नाती-गोती,
फक्त विचारांची परिपक्वता असते,
भांडण तिथे काहीच नसते,
विश्वासावर आधारित मैत्री असते ।।१।।
मैत्री ही फक्त मैत्री नसते,
तर सुख दुःखांची फेरवाटप असते,
चांगला मार्गही मैत्रीच दाखवते,
आपल्या जीवनाची प्रगती देखील मैत्रीच करते,
विश्वासावर आधारित मैत्री असते ।।२।।
समाजात मैत्रीशिवाय जगणे शक्य नसते,
जिथे जावे तिथे मैत्रीच दिसते,
मैत्री ही फक्त कामापुरती नसते,
तर आयुष्यभराची साथ असते,
विश्वासावर आधारित मैत्री असते ।।३।।
