भावना
भावना
दुःख आहे माझ्या मनात,
पण अश्रू नाही डोळ्यांत ।।
दुसऱ्यांना हसवते, आनंद देते,
पण आतून मात्र स्वतः रडते।।
प्रगतीच्या मार्गावर जाण्याची आकांशा आहे माझी,
आई-वडिलांना सुखी ठेवण्याची इच्छा आहे माझी।।
माझ्या मनातलं ओळखायची ती आता राहिली नाही जगात
ती आहे माझी आजी आता उरली फक्त मनात।।
