चहा
चहा
1 min
483
चहात असते काळ्या मातीसारखी चहा पावडर,
आणि बारीक मोत्यांसारखी साखर,
मला प्रश्न पडला -
चहा कसा बनवतात?
अर्धा चमचा साखर का चहा पावडर?
तेवढ्यात आवाज ऐकू आला,
अग ये गाढवे एवढी मोठी झालीस,
मात्र, अजून चहा बनवता येत नाही ! 'आई' म्हणाली
दोन चमचे साखर आणि अर्धा चमचा चहा पावडर,
बाप रे ! एका माणसाला चहा बनवायला
एवढा खटाटोप करावा लागतो,
हे आज मला कळलं
त्यात माझं काय जातंय,
चहा पिणारे माझे बाबा
नाही आवडला तर,
मग द्यायच कोणाचं तरी नाव ठोकून
घरी केव्हा पाहुणा आला,
तर आईला सांगणार मी नाही बनवणार चहा
कारण त्या पाहुण्याला घरात बसवायचं असेल
तर, मात्र तूच कर नेहमी चहा ।।
