STORYMIRROR

Pallavi Mohanale

Others

4  

Pallavi Mohanale

Others

कळत नकळत

कळत नकळत

1 min
507

कळत नकळत _ _ _ _

होत असतात गाठीभेटी

नजरेला भिडते नजर        

छेडली जाते हृदय सतार _ _ _ _

धुंदकरतात स्नेह्स्वर

परिचय _ _ _ _ त्याचा अन _ _ _ _ तिचा !

                       नंतर _ _ _ _

 त्याच्या गालावर पहाट असते

तिच्या गालावर लाली दिसते

 कधी तो हसतो ! कधी ती हसते !

चौफेर मग _ _ _ _


उधळतात रंग इश्काचे फुलतात फुले _ _

 धुंदावत हृदय तक्त

कधी तो हले ! कधी ती डुले !


                         कालांतराने _ _

 सुरु होतो नियतीचा खेळ

कोणालाच कोणाचा ना मेळ

                         दुरावतात _ _ _

कोसळते कुऱ्हाड दुःखाची

वाहतो आसवांचा महापूर

उध्वस्त होतात स्वप्नांकुर

तेव्हा _ _ _ _ कळत नकळत _ _ _ _


कधी तो रुसतो ! कधी ती रुसते !

कधी तो रडतो ! कधी ती रडते !

कळत नकळत हे सारे घडत असते

कळत नकळत हे सारे घडत असते !!


Rate this content
Log in