STORYMIRROR

Pallavi Mohanale

Others

4  

Pallavi Mohanale

Others

सायंकाळची वेळ

सायंकाळची वेळ

1 min
299

सायंकाळची वेळ मोठी चमत्कारिक !

सारं मूक झालेलं वातावरण,

निःस्तब्ध आकाश, काळेभोर झालेले ढग,

त्यातच दिसणारा, आपल्याकडे पाहून हसणारा चंद्र,

मन हलवून सोडणाऱ्या झाडांच्या भव्य सावल्या,

ऐकू येत असूनही बधीर होणारी भावना,

नक्कीच _ _ _ _ _

सायंकाळची वेळ मोठी चमत्कारिक !


हृदयातल्या छोट्याश्या कप्प्यात असणाऱ्या भावना,

उफाळून येतात आणि त्यातून दडवलेल्या आठवणी,

नाही ! नाही ! म्हणताना त्याची आठवण येतेच,

माझ्याकडे सतत पाहणारे ते डोळे,

हसणारा तो चेहरा, चोरून झालेली ती भेट,

दोघांमधल्या आणाभाका - आठवतातच !


आणि, एकमेकांचा हात सुटताना तो शेवटचा क्षण,

शांततामय वातावरण डोळ्यात आसवं आणतं,

शेवटी हृदयात असणारं गुपीत चित्रीकरणासारखं,

पुन्हा डोळ्यांसमोर उभं राहतं,

खरंच _ _ _ _ _

सायंकाळची वेळ मोठी चमत्कारिक !


Rate this content
Log in