आयुष्य
आयुष्य
समजवणारे अनेक असतात
मात्र... समजणारा एकच असतो,
समजवणारा थकून जातो पण,
समजवणारा विचारच करत असतो,
करू का नको ? करू का नको ? हा विचार मनात सारखा घोळत असतो,
पण शेवटी मात्र मनाला वाटत तेच करतो,
ऐकावे जनाचे नि करावे मनाचे,
ही म्हण वाचली होती केव्हातरी,
त्या म्हणीवर चालूनच तर,
निर्णय घ्यायचेत पुढील आयुष्याचे,
आयुष्य, आयुष्य म्हणजे काय ?
दोन दिवस सुख तर चार दिवस दुःख,
दुःख पदरी पडणारच आपल्या,
कारण सुख उपभोगायचे आहे ना,
दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख,
हे तर नशिबात घडताच राहते,
शेवटी अशी एक वेळ येते की,
दुःख आणि सुख उपभोगता येत नाही,
कारण, ते उपभोगण्यासाठी असलेले जीवन उरतच नाही ।।
कारण, ते उपभोगण्यासाठी असलेले जीवन उरतच नाही ।।
