एका सायंकाळी
एका सायंकाळी
सूर्याच्या मावळतीच्या छटा
दिसत होत्या पाण्यात
तेव्हाच दोघांनी पाहिले
एकमेकांच्या डोळ्यांत
बऱ्याच दिवसांची
होती ती ताटातूट
भेट होता झाली
आनंदाची लयलूट
प्रेमाची साक्ष देत
होते एकमेकांना
कसलीच भ्रांत
नव्हती त्या दोघांना
वेळ कशी सरत
होती वेगात पुढे
वेगळे होताना दोघे
घेत होते आढेवेढे

