आठवांची साठव
आठवांची साठव
चिरंतन अशी आठवांची माळ
मनोमन गुंफलेली रे
रूतली आता खोलवर
उकल कशी करू रे !!ध्रुवपद!!
किती दिवस झाले आता
तुझ्या माझ्या भेटीला
श्वासाचेही नाही मीलन
त्यांच्याच रे निश्वासाला !!1!!
क्षणोक्षणी येते सदैव
तुझीच रे आठवण
किती व कशी करू ही
आठवणींची साठवण !!2!!
आनंद माझा समाधान माझे
सारेच रे तुझ्याचपाशी
मनोमनी गुंतत जाऊन
करिते तुझ्याशीच गुजगोष्टी !!3!!

