कोरोना
कोरोना
1 min
326
कंटाळा आला कंटाळा आला
असं कशाला म्हणायचं?
खातपित मस्त मजेत
छंद जोपासत जगायचं !
विसरलो होतो आपण सारे
आपले मूळ संस्कृती व संस्कार
धडा शिकवायलाच जणू
कोरोनाने घेतला असा अवतार!
परोपकाराची लपलेली जाणीव
खोल सांदीत होती मनात
उपकार भावना न ठेवता
सद्गुणांची झाली बरसात !
गरिबांच्या सुखदुःखाची तर
कधी नाही केली कुणी मोजणी
कोरोनाच शिकवू लागला
करवून घेऊन धुणं आणि भांडी !
खरे सार्थकी जीवन जगण्याची
आता खरी आली आहे वेळ
तुम्हीच कंटाळा न येता साधा
त्याचा योग्य असा ताळमेळ !!
