STORYMIRROR

Nutan Pattil

Romance

3  

Nutan Pattil

Romance

चंद्र आहे साक्षीला

चंद्र आहे साक्षीला

1 min
402

पोर्णिमेची रात्र ही

चंद्र आहे साक्षीला!!

भेट दोन जीवांची

चांदण्यात प्रितीला!!


हात घेऊनी हाती

शपथ आयुष्याची!!

घेऊ आज साजना

कामना नाविन्याची!!


साथ देशील मला

जीवन प्रवासात!!

तुझीच राहीन मी

नेहमी आयुष्यात!!


निशा ही पुनवेची

चांदण्या सोबतीला!!

मधुर गीत गाऊ

चंद्र आहे साक्षीला!!


मिलनास व्याकूळ

धुंद असा नजारा!!

साजना प्राणप्रिया

येई अंगी शहारा!!


बेधुंद रात्र नवेली

मिठीत घेशील का?

मी तुझीच साजनी

साजन होशील का?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance