हॅलो
हॅलो
कधीतरी दोन दाने
रागाच्या भरात
फेकले होते जमिनीवर
वय झाले म्हणुन
मुले दुर्लक्ष करीत होती आताशा...
वेळ ही नीट जात नव्हता
कोणी नव्हते बोलायला आजुबाजुला
काय करावे, कसे करावे
असायचो चिंतेत सदा...
फेकलेले ते दाने
आपले इवलेशे दोन हात
वर करून मला 'हॅलो' करत आहे
असा आभास झाला खिडकीपाशी...
अंगणात खिडकीपाशी जावुन बघीतले
तर, खरच ते दोन हिरवे हात
'हॅलो', 'हॅलो'करत नाचु लागले वार्यावर
मला पाहुनी...
क्षणात माझा राग मावळला
मी ही हसलो, हसत राहीलो
ओंजळीत पाणी घेवुन
त्या बिज अंकुराला 'चहापाणी' दिले...
आता आमची गट्टी झाली
माझा राग हळुहळू कमी झाला
रोज नित्यनियमाने आमचे
'हाय,हॅलो,' 'चहापाणी' होऊ लागले...
बघता बघता,
रागाच्या भरात
फेकलेल्या त्या दान्यांचे
रोपट्यात रूपांतर झाले...
तो ही हसला, मी ही हसलो
मनात माझ्या हिरवा रंग भरला
आता मी हसत बिज पेरली आनंदात
छंद जडला झाडे लावा, झाडे जगवायचा!!!
