STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

3  

Pandit Warade

Inspirational

हे स्वातंत्र्या

हे स्वातंत्र्या

1 min
28.3K


हे स्वातंत्र्या, तुझ्याचसाठी

कित्येक वीर त्वेषाने लढले

हसतमुखाने तुझ्याचसाठी

कित्येक धारातीर्थी पडले...१


तुझ्याचसाठी किती जणांनी

घरा दाराची केली होळी

त्यागून त्या संसार सुखाला

छातीवरती झेलली गोळी...२


कित्येक नारी विधवा झाल्या

हे स्वातंत्र्या तुझ्याचसाठी

पुत्रही आपुले देत्या झाल्या

मायभूमीच्या रक्षणासाठी...३


प्राणांचीही बाजी लावून

बेड्या तोडल्या आंग्लसत्तेच्या

तमा न केली, जरी जाहल्या

चिंधड्या, चिंधड्या या देहाच्या..४


भारतभूमीच्या स्वातंत्र्याला

सदैव आम्ही अबाधित ठेऊ

हे स्वातंत्र्या, तुझ्याचसाठी

काळीजही आम्ही काढून देऊ..५


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational