हे रंग जीवनाचे...
हे रंग जीवनाचे...
हे रंग जीवनाचे
सांगा कुणास कळले
कधी सुखात न्हाले
कधी दुःखाने छळले
जीवनाच्या वळणावरती
काळाकुट्ट अंधार दाटतो
उजेडाचा एक किरण
मग ईश्वरासम वाटतो
भले कुठेही जावो आपण
विश्वास सर्वकाही असतो
आपल्यांनीच केलेला घात
मनात घर करून बसतो
हे रंग जीवनाचे बघा
अनाथांना सनाथ करतात
काळाच्या ओघात कुणी
अचानक अनाथ ठरतात
जीवनात होईल काय
हे एक कोडेच आहे
सर्व घडेल मनासारखे
असे ही थोडेच आहे
