हास्य कविता
हास्य कविता
बायको म्हणे नवऱ्याला
तुम्हाला मीच भेटले का सांगा
नवरा म्हणे तिला साजणी
तुह्याआधी होत्या खूप रांगा
एवढ्याच होत्या रांगा तर
मलाच का हो निवडलं
सोडून त्या सटव्यांना तुम्ही
मलाच का बरं सावडलं
ऐक ग साजणी तू आता
पोरी मला कॉलेजात पहायच्या
ती अप्सरा अन ती रंभा
रोजच्याच भेटीला यायच्या
आयुष्य होतं खूप सुखाचं
हास्य होतं माझ्या मुखावर
लग्न नावाचं आलं विघ्न
अन गदा पडली सुखावर
बऱ्याच होत्या मागावर अन
बऱ्याच होत्या या मनात
मीच सावरलो ग स्वतःले
साऱ्यांना दूर सारलं क्षणात
काळजावर ठेऊन दगड आता
मी बघ मनाची समजूत काढली
नको म्हणता साऱ्यांनी तुलाच
आपसूक माझ्या पुढ्यात वाढली
ही नको म्हणून केली विनवणी
अन भलताच होतो ओरडलो
तरी घरच्यांनी तुझ्यासोबत जुंपल
शेवटी मीही या जात्यात भरडलो
तुह्या येताच मी आता पुरा
आगीतला फुफाट्यात आलो
मन मारून बघ जगतोय अन
भलत्याच या सपाट्यात आलो
आता मले कळून चुकलं
बायको काय चीज असते
विना वादळ ,विना ढगांच्या
कडाडणारी वीज असते
