बेटी बचाओ बेटी पढाओ
बेटी बचाओ बेटी पढाओ
बेटी बचाओ बेटी पढाओ
नुसतीच वायरल पोस्ट आहे
मुलींचा जन्मदर घटतोय
ही धक्कादायक गोष्ट आहे
भ्रूणहत्या होते तिची तर
कोण जाणे काय फायदे
मिळणार आहेत
या गोष्टीचे दुष्परिणाम पुढे
भविष्यकाळात कळणार आहेत
ती जन्मली तरच राहू आपण
अन्यथा आपणही राहणार नाही
तिच्याविना हो आता कुणीही
पुढची नवी पिढी पाहणार नाही
