STORYMIRROR

VIJAY WATHORE

Romance

3  

VIJAY WATHORE

Romance

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

1 min
834



पहिलं वहिलं प्रेम

कधी मरत नसतं

नवचैतन्यासारख ते

ध्यानी मनी असतं

म्हणूनच जीवनात

हसण्याच कारण प्रेम असतं


त्यामुळे होणाऱ्या विरहाने

रडणार ते प्रांजळ मन असतं

मनातील होणाऱ्या भावना कल्लोळाच

ते प्रतिबिंब असतं

सोप नसतं इथे प्रेमी होणं

त्या शपथांना खर ठरवन.


देहाच्या मागे धावणारे बहु दिसतील

पण खर प्रेम करणारे क्वचितच आढळतील

म्हणूनच तर आयुष्यात तेच नशीबवान असतात

ज्यांना प्रेम मिळत असत

पहिल्या प्रेमाची संगतच

जीवनात प्रेरणा देत असत

आठवणींच्या आठवणींना स्मरण

हेच तर प्रेम असत


पहिलं प्रेम यात विश्वास

हेच मूळ असत

आणि त्या अतूट विश्वासावरच

पहिलं प्रेम निर्भर असत

जातो जेव्हा या विश्वासाला तडा

तेच मन पुन्हा प्रेम करायला धजत नसतं

म्हणूनच ते ध्यानी मनी अंतरी

पुन्हा पुन्हा स्मरत असतं

पहिलं वहिलं प्रेम

कधी मरत नसतं

म्हणूनच तर ते

पुन्हा पुन्हा स्मरत असत.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance