बंध प्रेमाचे अतूट...
बंध प्रेमाचे अतूट...
बंध प्रेमाचे अतूट
तुझ्यामुळे हे जुळले
प्राजक्तांची फुले आज
तुझ्यासाठी उधळिले
जन्मा-जन्मांचे हे नाते
अलगुज सावरावे
प्रीतीत तुझ्या मी असे
बेधुंद हे बावरावे
छबी तुझीच अगदी
प्रेमात मी सजवावी
रंगीबेरंगी होऊन
रात्रही मी जागवावी
प्रेमाच्या या बंधामध्ये
तुझ्यात मी गुरफटावे
हळव्या या भावनांना
अंतरात साठवावे
तुला द्यावे सुख सारे
दु:खांना मी सांभाळावे
बंध रेशमांचे असे
सदैव ते उजळावे

