विरहात आठवण
विरहात आठवण
पायीचे पैंजण तुझ्या
हृदयास साद घाली
विरहात आठवण तुझी
मेंदूत वाद घाली
ओठावरचे हसू तुझ्या
कवितेस जन्म घाली
तू आहेस राजकुमारी
तूच माझी सनम झाली
कळीसम लाजणं तुझ
प्रसंशेस खाद घाली
गुणगुणत जाणं तुझ
रोमारोमात नाद घाली
नजरेचा तीर तुझा
जणू श्वासांवर घाव घाली
सागरात प्रीतीच्या तुझ्या
बुडण्यास नाव आली

