प्रजासत्ताक
प्रजासत्ताक
प्रजासत्ताक राष्ट्र आपले
उगाच नाही हो जाहले
देशभक्तीच्या चिंगारीने
आपुले बलिदान वाहिले
देशा होती गुलामगिरी
अन होती अन्यायी सत्ता
पारतंत्र्यात जगणाऱ्यांना
नव्हता स्वातंत्र्याचा पत्ता
कुठून एक ती ठिणगी पडली
अन रणसंग्राम जाहला सुरु
देशा करण्या स्वातंत्र्य मग
झटले हो शिष्य अन गुरू
कित्येकांनी घरदार सोडले
दिले हो अमूल्य योगदान
राष्ट्रासाठी ते अमर जाहले
देऊन आपले बलिदान
लढले योद्धे होऊन धट
उधळून लाविले सारे कट
करार करून इंग्रजांशी
स्वातंत्र्याची घातली अट
स्वातंत्र्याचा सूर्य उगवला
सत्ताधारी झाले परास्त
प्रजासत्ताक झाले राष्ट्र
प्रजासत्ताक झाले राष्ट्र
